Ad 1
Ad 2
Ad 3

निरोप समारंभ सोहळ्यात बदली झालेल्या शिक्षकाचा सत्कार

सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथिल जिल्हापरिषद शाळेतील  बदली झालेल्या शिक्षकांना निरोप समारंभ सोहळा समारंभ कार्यक्रमात  सत्कार करण्यात आला. तसेच नवीन शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.  श्रीकांत म्हेत्रे, श्री चंद्रकांत कदम , श्रीम ढेले मॅडम याची बदली झाली.

निरोप समारंभ कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ. सखुबाई रामेश्वर बचाटे तसेच प्रमुख पाहुणे गावचे ग्रामपंचायत सदस्य अमोल बचाटे सामाजिक कार्यकर्ते श्री रामेश्वर बचाटे शाळेचे मुख्याध्यापक श्री मारुती तिडके सर , केंद्रप्रमुख श्री जोशी सर , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यशोदा जाधव,कुंडलिक कांबळे सर, श्री राजू सगरे सर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती माणिक बचाटे, सुभाष खुरपे ,पारस मामा सुरंजे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. अध्यक्षांच्या हस्ते बदली झालेल्या शिक्षकांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांना निरोप देण्यात आला त्यानंतर नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री संतोष दिवटे सर व श्री अमोल अरबुने सर यांचे सामाजिक कार्यकर्ते श्री रामेश्वर बचाटे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाची संकल्पना श्री रामेश्वर बचाटे सामाजिक कार्यकर्ते यांची असून त्यांनी सर्व बदली झालेल्या शिक्षकांना बॅग व महापुरुषांचे फोटो देऊन गौरव करण्यात आला. श्री रामेश्वर बचाटे सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Advertisement

Advertisement Image

Leave a comment