Ad 1
Ad 2
Ad 3

भूस्खलन झाल्याने वडगाव स्टेशन जवळ लोहमार्ग खचल्याने २४ तासापासून रेल्वे वाहतूक बंद पडली.

परभणी ते परळी लोहमार्गवर गंगाखेड रेल्वेस्थानकापासुन १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव स्टेशन जवळ ढगफुटी सदृश पडलेल्या पावसाने भूस्खलन झाल्याने लोहमार्ग खचला. लोहमार्ग खचल्याने शणीवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून रविवार रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मार्गावरील सर्वच रेल्वेगाड्याची वाहतूक बंद होती.अभियांत्रिकी विभागाला रविवार सायंकाळपर्यंत खचलेल्या लोहमार्गची दुरूस्ती करण्याचे काम सुरू होते.या मार्गावरील पाच प्रवाशी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. इतर रेल्वेगाड्या दुस-या मार्गानी वळवण्यात आल्या.

नांदेड रेल्वे विभाग हा भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रपैकी एक आहे.या विभागाचा अभियांत्रिकी विभाग म्हणावा तसा कार्यक्षम नसल्याने नेहमीच दुरूस्तीची कामे करताना वेळ लागतो असा आरोप प्रवाशांकडून होतो.

शणीवार पासुन पर्मनंट विभाग गंगाखेड ते निळा वडगाव दरम्यान खचलेल्या लोहमार्गाच्या दुरूस्तीचे काम करत होते.परळी ते गंगाखेड दरम्यान वडगाव स्टेशन आहे.या स्टेशन जवळ लोहमार्ग खचला.यामुळे या मार्गावरील पाच रेल्वेगाड्या रद्द केल्या.यात पुर्णा ते हैदराबाद, पंढरपूर ते निजामाबाद, हैदराबाद ते पुर्णा, पुर्णा ते परळी, परळी ते पुर्णा या रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या.

अंशत रद्द केलेल्या गाड्या 

हैदराबाद ते पुर्णा, बेगळूर ते नांदेड, नांदेड ते बेगळूर, निजामाबाद ते पंढरपूर, आदीलाबाद ते परळी या ६ रेल्वेगाड्या अंशत रद्द केल्या होत्या.

मार्गात बदल

एकुण ९ रेल्वेगाड्याचा रूट (मार्ग) बदलण्यात आला.अमरावती ते पुणे, गुटूर ते औरंगाबाद, पनवेल ते नांदेड, तिरूपती ते औरंगाबाद, नांदेड ते पनवेल, औरंगाबाद ते गुंटूर, साईनगर शिर्डी ते सिकंदराबाद, नागपुर ते कोल्हापूर या रेल्वेगाड्याचा रूट बदलला होता.

Advertisement

Advertisement Image

Leave a comment