Ad 1
Ad 2
Ad 3

ओबीसी कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध, मुख्यमंत्री याना निवेदन

परभणी जिल्हा प्रतिनिधी  ( अनिल शेटे ) -गंगाखेड

येथिल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी पवन करवर या तरुणावर झालेल्या  हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन दि.२५ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय मार्फत मुख्यमंत्री याना देण्यात आले.
 
राज्यात ओबीसी नेते व कार्यकर्त्यांवर वाढत असलेल्या हल्ल्यांचा संदर्भ देत माजलगाव येथे 23 सप्टेंबर पवन करवर या तरुणांवर हल्ला झाला होता.  या हल्ल्याचा  निषेध नोंदवण्यात आला.या  हल्ल्यातील  आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन गंगाखेड तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.या निवेदनावर सुरेश बंडगर, गोविंद लटपटे, हनुमान देवकते, सदाशिव कुंडगीर, दत्ता होळंबे, नितीन नागरगोजे, शिवाजी बगडे, भगवान रुपनर, मुंजाभाऊ लांडे, रघुनाथ मदने, माधव कुकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Advertisement

Advertisement Image

Leave a comment