Ad 1
Ad 2
Ad 3

चोरट्यानी धारदार शस्त्राने शेत आखाड्यावरील वृद्ध दांपत्यावर प्राणघातक हल्ला, सोन्याचे दागिने लंपास

परभणी जिल्हा प्रतिनिधी (अनिल शेटे)- पालम तालुक्यातील चाटोरी जवळ असलेल्या वसंतनगर तांडा शेत शिवार आखाड्यावर गुरवारी रात्री ते शुक्रवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वृद्ध दांपत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.गंभिर हल्लात वृद्ध दांपत्य रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते.सकाळी ९ वाजता सदरील घटना समजताच नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.या घटनेत दोन तोळ्याचे दागिने चोरट्यानी लंपास केले.गंगाखेड रुग्णालयातुन पोलीस ठाण्यात एमएलसी पाठवण्यात आली.

 गंगाखेड पासुन १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या वसंतनगर शेत शिवारात उत्तम चव्हाण याचा शेत आखाडा आहे.या शेत आखाड्यावर राहणारे उत्तम लोभाजी चव्हाण वय ६० वर्ष, जिजाबाई उत्तम चव्हाण वय ५८ वर्ष हे दांपत्य राहतात.गुरवारी रात्री ते शुक्रवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने धारदार शस्त्राने या दांपत्यावर प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात जिजाबाई याच्या डोक्यावर गंभिर जखमा झाल्या असुन त्याच्या डोक्यावर २८ टाके पडले.मेंदूपर्यंत रक्तस्त्राव गेल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे.उत्तम चव्हाण याच्या डोक्यावर गंभिर मुकामार दिला.कानावर धारदार शस्त्राने मारल्याने कान फाटला.नाकातुन रक्तस्त्राव होतो.हे वृद्ध दांपत्य बेशुद्ध अवस्थेत परभणी येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेतात.सदरील घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता चव्हाण दांपत्याचा नातु नेहमीप्रमाणे वसंतनगर येथिल घरून शेत आखाड्यावर आजोबा , आजोला चहा घेऊन आला.दरम्यान यावेळी आजी आजोबा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले.नातवाने आरडाओरड केल्याने परीसरातील नागरीक घटनास्थळी धाऊन आले. ही घटना वसंतनगरात माहिती होताच नागरीकाची घटनास्थळावर गर्दी झाली होती.पोलीसाना सुचना देऊन वृद्ध दांपत्याच्या नातेवाईकानी गंगाखेड येथील उपजिल्हारूग्णालयात दाखल केले.या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणीला हलवण्यात आले. उपजिल्हारूग्णालयातुन गंगाखेड पोलिस ठाण्यात एमएलसी पाठवण्यात आली.

 दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, तसेच शेत आखाड्यांवर सुरक्षेची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पुढे येते.

Advertisement

Advertisement Image

Leave a comment