Ad 1
Ad 2
Ad 3

गोदावरी नदीला पुरस्थिती गंभिर होत असल्याने जायकवाडी, माजलगाव धरणातून विसर्ग बंद केला.

गंगाखेड गोदावरी नदीची पुरस्थिती गंभिर होत असल्याने जायकवाडी आणि माजलगाव धरणातून गोदावरी नदीत सोडण्यात येणा-या पाण्याचा विसर्ग दि.२४ सप्टेंबर बुधवार रोजी पुर्ण बंद


केला.दि.२३ सप्टेंबर मंगळवार रोजी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पुराची पतळी वाढणार असल्याने बाधित गावे व काॅलण्याची संख्या वाढण्याचा संभाव्य धोका आहे.धारासुर येथे गोदावरी येथिल काही कुटूंबाना स्थलांतरीत केले.
        गोदावरी नदीवर असलेल्या माजलगाव व जायकवाडी आणि गोदावरी नदी लाभक्षेत्रात ढगफुटी सदृश पावसाने गोदावरी नदीला पुर आला.तसेच जायकवाडी, माजलगाव, या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीचे पात्र ३ लाख ४१ प्रती सेकंद क्युसेकने प्रवाह वाहत आहे.गोदावरी नदीचे पात्र धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने गंगाखेड तालुक्यातील १० गावे आणि शहरातील ४ काॅलण्यात पाणी आले. शहरातील तारू मोहल्ला, अरफात नगर, बरकत नगर , महेबुब नगर या काॅलण्यात पाणी आल्याने तेथील रहिवाशाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.नांदेड रोड परीसरातील असलेल्या ज्ञानोपासक विद्यालयात बाधित कुटुंबाचे स्थलांतर केले. पाण्याच्या पुरामुळे दहा गावांचा संपर्क तुटला आहे.त्यात सायळा, सुनेगाव, जवळा, नागठाणा, गौडगाव, खळी, इरळद, धारखेड ही गावे बाधित झाली.या गावाना राषण, औषधी, गरजु वस्तु मिळण्यासाठी सनियंत्रण समिती प्रयत्न करते. नगर पालीका क्षेत्रातील सनियंत्रण समिती स्थलांतरीत कुटूबीयाना धिम्मा गतीने अन्नधान्य, भोजणाची व्यवस्था करत असल्याने आश्रीत नागरीक नाराजी व्यक्त करीत आहेत. 
    प्रतिक्रिया:- उपविभागीय महसूल अधिकारी 
जीवराज डापकर यानी नवराष्ट्र सांगितले , की मंगळवारी जायकवाडी आणि माजलगाव धरणातुन सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बुधवारी उशिरापर्यंत गोदावरी नदीची पुरस्थिती आणखी वाढेल.मात्र सध्या गोदावरी नदीची पुरस्थिती अधिक धोक्यात येऊ नये म्हणून बुधवारी जायकवाडी आणि माजलगाव धरणातुन गोदावरी नदीला सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement Image

Leave a comment

Advertisement

Get In Touch

National Apartment Akot File Akola Maharashtra - 444001

(+91) 94275 90781

info@thecurrentscenario.in

Follow Us
Our Team

English News Paper

Join Our News
Our Partners
Partner 1