Ad 1
Ad 2
Ad 3

उज्वल यशासाठी जिद्द,चिकाटी कष्टाशिवाय पर्याय नाही–डॉ.रोमा तांबोळी

गंगाखेड शहरातील गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूल येथे शनिवार, दि.20 सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी 11 ते सायं. 5 या वेळेत शिक्षक-पालक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते 

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका डॉ.प्रा.कविता सावंत (साळवे) होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र यूपीएससी टॉपर व सेंट्रल गव्हर्नमेंटचे क्लास-1 मेडिकल ऑफिसर डॉ.रोमा मुजमिल तांबोळी,प्रा.अनिल उजगरे (संस्थापक–अपेक्स करिअर अकॅडमी),श्रीमती मंजुषा जामगे (योग शिक्षिका–पतंजली, परभणी) उपस्थित होते.

डॉ.तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “उज्वल यशासाठी जिद्द, चिकाटी व कष्टाशिवाय पर्याय नाही.” प्रा.उजगरे यांनी करिअर पायाभरणीबाबत प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर श्रीमती जामगे यांनी योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिक घेऊन पालकांना सहभागी करून घेतले.

प्राचार्या डॉ.कविता सावंत यांनी पालकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थी सोन्यासारखे नव्हे तर हिऱ्याप्रमाणे घडविण्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांची संयुक्त भूमिका आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.नव्या युगातील आव्हाने झेलून यशस्वी पाल्य घडवण्याच्या योग्य पद्धती. अभ्यासाचे योग्य तंत्रज्ञान. पाल्याला प्रोत्साहीत करण्याचे योग्य मार्गदर्शन यावेळी पालकाना करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील मुजमुले यांनी केले.कार्यशाळा यशस्वीतेसाठी गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूल,आयुष प्रायमरी व सेकंडरी सेमी इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षकवृंदाने परिश्रम घतले.     

Advertisement

Advertisement Image

Leave a comment