Ad 1
Ad 2
Ad 3

सलग तिस-या वर्षी रुद्राक्ष जिम्नॅस्टिक्स क्लासेसचे विविध खेळात वर्चस्व कायम, पालकवर्गातुन कौतुक

शालेय जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक व मलखांब क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे दि.19 सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून जिल्हा संघटनेचे तथा राज्य संघटनेचे उपाध्यक्ष श्री उत्तमराव लटपटे हे आयोजक म्हणून होते.
 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे तालुका क्रीडा अधिकारी श्री कल्याण भोले , तालुका क्रीडा अधिकारी श्री सुयश नाटकर , तालुका क्रीडा अधिकारी श्री रोहन आंबेकर  हे उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पंच श्री प्रदीप लटपटे , राष्ट्रीय पंच तथा मार्गदर्शक श्री संदीप लटपटे , राष्ट्रीय पंच श्री वेदांत मुंडे , रुद्राक्ष जिम्नॅस्टिक क्लासेसचे संचालक श्री धनराज मुंडे  हे प्रमुख पंच म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत गंगाखेड येथील रुद्राक्ष जिम्नास्टिक क्लासेसचे वर्चस्व कायम राहिले. जिल्हास्तरीय मलखांब, जिम्नॅस्टिक यश संपादन करून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. सलग तिसऱ्या वर्षी रुद्राक्ष क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व कायम राखले.14 वर्षे वयोगटामध्ये मुलांमध्ये मिथिलेश विष्णू तांदळे( गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूल ), 17 वर्षे वयोगट मुलांमध्ये शिवम कृष्णा मुंडे( गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूल ), स्वप्निल तुकाराम आवके ( वेदांत विद्यालय गंगाखेड ), 17 वर्ष मुलींमध्ये अंकिता पाटलोबा मुंडे ( वेदांत विद्यालय गंगाखेड ) ,अश्विनी रोहिदास भोसले ( जिल्हा परिषद हायस्कूल मुळी) , पल्लवी कांगणे ( जिल्हा परिषद प्रशाला गंगाखेड ), रूपाली लांडे ( जिल्हा परिषद प्रशाला गंगाखेड ), सुवर्णा रविंद्र जाधव ( सरस्वती विद्यालय गंगाखेड ), 19 वर्षातील मुलं ईशांत सूर्यकांत शेटे  ( व्यंकटेश विद्यालय गंगाखेड ) , वनराज भक्तराम गीते ( प्रतीक कनिष्ठ महाविद्यालय गंगाखेड ) , 19 वर्षातील मुली श्वेता लक्ष्मण भोसले ( जिल्हा परिषद मुळी ) , गायत्री काकरवार ( जिल्हा परिषद मुळी ), श्रुती राम पवार ( जिल्हा परिषद मुळी ) , धनश्री बुधवारे ( श्री बालाजी विद्यालय इसद, ज्ञानेश्वरी झिलमे ( श्री बालाजी विद्यालय इसाद ) ,राधा लांडे ( जिल्हा परिषद हायस्कूल ), भगवती पांचाळ ( जिल्हा परिषद हायस्कूल गंगाखेड ),खेळाडूंना पुढील विभागीय स्पर्धेसाठी गंगाखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे , गटशिक्षणाधिकारी तथा मुख्याध्यापक जिल्हा परिषद मुळी श्री शशिकांत मुंडे,  श्री विलास राठोड , तालुका क्रीडा संयोजक गंगाखेड  श्री माणिक नागरगोजे मुख्याध्यापक झोला प्राथमिक विद्यालय, श्री धनराज मुंडे  रुद्राक्ष जिम्नास्टिक क्लासेस गंगाखेड, विठ्ठल लटपटे  शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय कोद्री, अभिमन्यू वानखेडे  शारदा विद्या मंदिर कोद्री, राहुल राठोड  गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूल, अंगद पौळ  वेदांत विद्यालय गंगाखेड, जयदीप फड  जिल्हा परिषद हायस्कूल, समुद्र मुंडे जिल्हा परिषद शेळमोहा, ओमकार गुट्टे  रुद्राक्ष बाल संस्कार केंद्र गंगाखेड, वनराज गित्ते  रुद्राक्ष मलखांब क्लासेस गंगाखेड यानी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक करून सत्कार केला.

Advertisement

Advertisement Image

Leave a comment